
।। विद्यादान योजना ।।
शिकवू तिला मनासारखे,
मदतीचा हात पुढे करू,
कन्या ही तर भविष्य अपुले,
स्वप्नात तिच्याही रंग भरू!!!
समाजातल्या प्रत्येक घटकाला शिक्षण घेत आपलं आयुष्य घडवण्याचा हक्क असतो. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी! पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या काही हुशार मुलींना इच्छा असूनही इयत्ता १०वी नंतर शिक्षण घेता येत नाही. अशा मुलींना मदत करण्यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’ या संस्थेने ‘विद्यादान योजने’ चा संकल्प केला आहे.

"ओम प्रतिष्ठान"
ओम प्रतिष्ठान विषयी-
ओम प्रतिष्ठान ही संस्था गेल्या दहा वर्षापासून( जून २०११) शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टरित्या कार्यरत आहे.

शैक्षणिक कार्य -
‘ओम प्रतिष्ठान’ ने कामगार वर्गातील मुलांना अल्पदरात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून वाल्हेकरवाडी येथे ‘वंडरलॅन्ड स्कूल’ ही शाळा सुरू केली. मुलांचा बौद्धिक विकास करण्याबरोबरच त्यांच्यातले कलागुण जोपासणे, खेळाची आवड निर्माण करणे, सामाजिक भान जोपासणे हे उद्देश ही यात आहेत. त्यादृष्टीने मुलांच्या पालकांनाही वेगवेगळ्या उपक्रमातून मार्गदर्शन केले जाते.
सामाजिक कार्य -
पिंपरी चिंचवड मधे सामाजिक बांधिलकी जपत ‘ओम प्रतिष्ठान’ वेगवेगळे उपक्रम राबवते. आपल्या परिसरातील ‘किनारा वृद्धाश्रम’, ‘नचिकेत बालग्राम’, ‘गुरुकुल संस्था’ इथे आवश्यकतेनुसार कपडे, धान्य व खाऊ वाटप हे काम या संस्थेने केले. कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत, पवना नदी स्वच्छता मोहीम यासारख्या उपक्रमातही सामाजिक जाणिवेचे भान ठेवत हातभार लावला.
चला तर मग, आपणही या विद्यादान योजनेत सामील होत, आपला खारीचा वाटा उचलुया!! ज्ञानाच्या प्रकाशाने मुलींचे आयुष्य प्रकाशमान करू या!
स्वयंसेवकांसाठी
यावर्षी ‘ओम प्रतिष्ठान’ने एका अभिनव योजनेचा संकल्प केला आहे.
विद्यादान योजनेविषयी:
विद्यादान हे सर्वोत्तम दान’ आहे जे दिल्याने उत्तरोत्तर ज्ञान वृद्धिंगत होत जाते. हे लक्षात घेऊन ‘ओम प्रतिष्ठान’ ने या योजनेचा संकल्प केला.
आर्थिक कारणामुळे दहावीनंतरचे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या १०० हुशार आणि शिक्षणाविषयी ओढ असणाऱ्या मुलींना महाविद्यालयीन किंवा व्यावसायिक शिक्षणासाठी मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
ही मदत खालील प्रकारे केली जाईल -
- शिष्यवृत्ती - शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत
- कौशल्य विकास - मुलींच्या उपजत कौशल्य विकासासाठी साह्य.
- करिअर मार्गदर्शन - वेगवेगळ्या करियर विषयी माहिती देत कल तपासणे.
- व्यावसायिक अभ्यासक्रम - या अभ्यासक्रमाद्वारे मुलींना तात्काळ स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उपयोगी अभ्यासक्रमांची माहिती दिली जाते.
निवड प्रक्रिया -
या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र आणि उत्सुक मुलींची ओम प्रतिष्ठान तर्फे चाचणी घेतली जाईल.
चाचणीत उत्तीर्ण मुलींना पुढील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
- इयत्ता दहावीची गुणपत्रिका
- आधार कार्ड
- वडिलांचा उत्पन्नाचा दाखला
यानंतर प्रत्यक्ष मुलाखत होऊन निवड प्रक्रिया पूर्ण होईल (शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थेकडे पाठवली जाईल).
गरजू विद्यार्थिनी नोंदणी करण्याकरीता फॉर्म भरुन वरील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज करणे अनिवार्य आहे…
निवड झालेल्या मुलींनी आपल्याला मिळालेला ज्ञानाचा वसा पुढेही चालू ठेवावा अशी संस्थेची मनापासून इच्छा आहे. यासाठी विद्यार्थिनींनी खालील अटींचे पालन करावे –
- योजनेत सामील मुलींनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
- भविष्यात, दुर्बल घटकातील दोन मुलींना आर्थिक मदत करणे.









मदत कशी करायची:
- आर्थिक मदत करून.
- इतरांना योजनेबद्दल माहिती सांगणे.
- गरजू मुलींची माहिती पाठवणे.
- C S R फंडिंग मधून आर्थिक मदत मिळवून देणे.
चला तर मग, आपणही या विद्यादान योजनेत सामील होत, आपला खारीचा वाटा उचलुया!!
ज्ञानाच्या प्रकाशाने मुलींचे आयुष्य प्रकाशमान करू या!

स्वयंसेवकांसाठी संपर्क
Scan To Donate
