"ओम प्रतिष्ठान"
ओम प्रतिष्ठान विषयी-
ओम प्रतिष्ठान ही संस्था गेल्या दहा वर्षापासून( जून २०११) शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टरित्या कार्यरत आहे.
शैक्षणिक कार्य -
‘ओम प्रतिष्ठान’ ने कामगार वर्गातील मुलांना अल्पदरात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून वाल्हेकरवाडी येथे ‘वंडरलॅन्ड स्कूल’ ही शाळा सुरू केली. मुलांचा बौद्धिक विकास करण्याबरोबरच त्यांच्यातले कलागुण जोपासणे, खेळाची आवड निर्माण करणे, सामाजिक भान जोपासणे हे उद्देश ही यात आहेत. त्यादृष्टीने मुलांच्या पालकांनाही वेगवेगळ्या उपक्रमातून मार्गदर्शन केले जाते.
सामाजिक कार्य -
पिंपरी चिंचवड मधे सामाजिक बांधिलकी जपत ‘ओम प्रतिष्ठान’ वेगवेगळे उपक्रम राबवते. आपल्या परिसरातील ‘किनारा वृद्धाश्रम’, ‘नचिकेत बालग्राम’, ‘गुरुकुल संस्था’ इथे आवश्यकतेनुसार कपडे, धान्य व खाऊ वाटप हे काम या संस्थेने केले. कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत, पवना नदी स्वच्छता मोहीम यासारख्या उपक्रमातही सामाजिक जाणिवेचे भान ठेवत हातभार लावला.






